¡Sorpréndeme!

आता मुंबई ते अलिबाग फक्त ९० मिनिटात | Mumbai to Alibaug Ferry Ride | लोकमत मराठी न्यूज़

2021-09-13 1 Dailymotion

आता मुंबई ते अलिबाग फक्त ९० मिनिटात.

समुद्र मार्गे आता मुंबई ते अलिबाग ला पोहोचायला लागतील आता फक्त ९० मिनिटे

मुंबई ही स्वप्नांची नगरी. इथे संपूर्ण भारतातून लोक आपल्या पोटा पाण्याच्या व्यवसाय करण्या करता इथे येतात. मुंबई शहर कधी झोपतच नाही. कारण होणार हॉर्न चे आवाज अन होणारी धावपळ कोणाला झोपू देतच नाही. आणि ह्यातही कधी वीकएंड ला कुटुंबा ला घेऊन कुठे सहलीला जायचा विचार केलास तर. ट्रॅफिक मुळे पोहोचता पोहोचता कुठल्या ही व्यक्ती मध्ये पिकनिक एन्जॉय करण्याची शक्ती उरत नाही. पण आता अलिबाग ते मुंबई हा ४ तासांचा प्रवास ९० मिनिटात होणार आहे. मुंबई मेरीटाइम बोर्ड (MMB), मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT) आणि सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO). ह्यांच्या मदतीने हा प्रवास शक्य होणार आहे. फेरी ची रो रो सेवा म्हणजे रोल ऑफ आणि रोल ऑन सुविधा. ह्या मध्ये प्रत्येक फेरी मध्ये ३५० लोकांन बरोबर ४० गाड्या ही प्रवास करू शकतील. ही सुविधा एप्रिल २०१८ पर्यंत सुरु होऊ शकेल.